पुणे (हवेलीनामा वृतसमूह) मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कारवाई करत एकूण १६,८०,०००/- रू किं. चा २८ किलो गांजा जप्त केला.
अंमली पदार्थ विरोधी पथक २, चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे मुंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत गस्तीवर असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून मुंढवा कोरेगांव पार्क रस्त्यावर शहा यांचा मोकळा प्लॉट, मुंढवा पुणे येथे प्रमोद सुधाकर कांबळे, वय ४४ वर्षे रा किल्ला वेस, करमाळा सोलापुर पुणे, विशाल दत्ता पारखे वय ४१ वर्षे रा प्लॅट नं ६, मोहन नगर, आदित्य सोसा. विश्रांतवाडी पुणे यांकडून एकुण १६,८०,०००/- रु.कि. चा गांजा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
ही कारवाई पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, मयुर सुर्यवंशी, संदिप जाधव, संदिप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी केली.
