थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत त्यामुळे विद्यमान आमदारां बरोबरच सगळ्या पक्षातील इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून प्रत्येक मतदारसंघात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून मतदारसंघात विकास कामांच्या निधीची खैरात झाली असून आचारसंहिता कधीही लागू शकते त्यामुळे विकास कामांच्या भूमीपूजनाचा सपाटा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदार संघ शिरूर हवेली मतदार संघ सध्या आघाडीवर आहे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटण्याची जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती मिळत असून विद्यमान आमदार अशोक पवार यांनाच पुन्हा संधी मिळणार असून त्यांनी कामाला सुरुवात केली. शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी देखील प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून विविध विकासकामांच्या माध्यमातून तसेच मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध यात्राचे आयोजन बचत गटांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करुन हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांनी देखील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघवर दावा ठोकला आहे.
दुसरीकडे महायुतीत मात्र उमेदवारीवरुन अजूनही तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे.
महायुतीत जागेवरच रस्सीखेच सुरू असून भाजप कडून पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, प्रमुख दावेदार आहेत पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या माजी व्हाईस चेअरमन जयश्रीताई पलांडे, यांचे देखील नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून  वाघोली चे शासन नियुक्त नगरसेवक शांताराम बापू कटके, दादा पाटील फराटे,यांची नांवे चर्चेत आहेत.शांताराम कटके यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली असून अनेक गावांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला लाडका भावी आमदार म्हणून जाहिरात बाजी सुरु आहे.परंतू गेली दोन दिवसांपासून महायुतीत शिरुर हवेली मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख माऊली कटके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे घड्याळ मनगटावर बांधणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ऐनवेळी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्ञानेश्वर कटके यांना घड्याळ चिन्हावर मैदानात उतरविण्यात येणार असल्याची चर्चा पूर्व हवेलीत जोरदारपणे गावातील प्रत्येक चौकात सुरू आहे शिवसेना उध्दव ठाकरे या पक्षाला मोठा धक्का बसणार का याकडे राजकीय विश्लेषक लक्ष लागून राहिले आहे.त्यातच या मतदारसंघात अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे तसेच माऊली कटके यांची वाढती लोकप्रियता हे समीकरण जुळले तक्र शिरूर हवेलीत निकाल वेगळा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. माऊली कटके देखील वेट अँड वॉच च्या भूमिकेत असून अपक्ष देखील लढण्याची तयारी केली असल्याची माहिती मिळत आहे.तर दुसरीकडे त्यांचे कट्टर विरोधक शांताराम कटके हे देखील शड्डू ठोकून तयार आहेत जर माऊली कटके यांना पक्षात प्रवेश दिला तर शांताराम कटके नेमकि काय भुमिका घेणार यावर देखील बरेच काही अवलंबून आहे.तर या मतदारसंघात दोनवेळा अशोक पवार तर दोनवेळा बाबूराव पाचार्णे यांनी विजय मिळवला असून यंदा शिरूर हवेलीची निवडनूक रंगतदार होणार असून तिरंगी होणार की दुरंगी होणार हे थोड्याच दिवसात चित्र स्पष्ट होणार असून महायुतीत ही जागा नेमकी कोणाला जाणार यावर बरीच गाणित अवलंबून आहेत प्रदीप कंद यांची देखील जोरात तयारी सुरु असून त्यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढला आहे. महाविकास आघाडीत निष्ठावंतला संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे तर महायुतीत मात्र उमेदवारीवरुन चर्चाचे पेव फुटले असून निष्ठावंताला संधी मिळणार का लोकसभे सारखे ऐनवेळी निष्ठावंत डावलून आयत उमेदवाराला संधी देणार याकडे राजकीय विश्लेषक लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *