पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) भिगवण येथील वनरक्षक याचेवर वनविभागाच्या रस्त्यावर टाकलेल्या मुरुमा संदर्भात तक्रार न करण्यासाठी तक्रारदाराकडुन लाच मागणी केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली त्याचे विरुद्ध भिगवण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, भिगवण येथील तक्रारदार यांनी ते रहात असलेल्या घरासाठी वनविभागाच्या जागेतून पुर्वीपासून रस्ता वापरत असलेल्या रस्त्यावर अतिवृटी झाल्यामुळे खड्डे व चिखल झाला असल्याने स्वखर्चाने रस्त्यावर मुरूम टाकला त्यावर लोकसेवक उल्हास मोरे यानी तू वनखात्याच्या जमीनीवर मुरुम का टाकला ? म्हणुन गुन्हा दाखल करतो असे सांगितले. लोकसेवक मोरे यांनी तक्रारदार यांचेकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी १०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली होती.

सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक उल्हास मोरे यांनी तक्रारदार यांचेकडे वरील कामासाठी ७,०००/- रुपयांची लाच मागणी करुन, पंचासमक्ष तडजोडीअंती ६,०००/- (सहा हजार रुपये) रुपये लाच रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लोकसेवक उल्हास मोरे यांचेवर भिगवन पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे वरील प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *