थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) गेली नऊ दिवस चालू असलेल्या नवरात्र उत्सवाची आज सीमोल्लंघनाने सांगता झाली यात आबालवृद्ध तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. थेऊरच्या दसऱ्यास ऐतिहासिक परंपरा लाभली असून अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी गणपतीची उत्सवमूर्ती पालखीतून सीमोल्लंघनासाठी निघते.
नवरात्र उत्सव चालू झाल्यानंतर गेली नऊ दिवस थेऊर येथील ग्रामदैवत श्री म्हातारीआई व तुळजाभवानी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.दसऱ्याच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्री चिंतामणी गणपतीची महापुजा गिरीश आगलावे यांनी केली.दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.सायंकाळी पाच वाजता श्री चिंतामणीची उत्सवमूर्ती पालखीतून सीमोल्लंघन करण्यासाठी वाजतगाजत निघतात यासाठी थेऊर येथील आगलावे बंधू याचा भारत बँड हे याचे खास आकर्षण असते.ही पालखी देवालयाचे पुजारी आगलावे बंधू यातगजानन आगलावे,मुकुंद आगलावे यांनी सारथ्य केले. या सोहळ्याला गावातील जेष्ठ मंडळी उपस्थित होती गावातून पालखी सोहळा जातो तेंव्हा जागोजागी रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या घालुन सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार समन्वय सामितीचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,हवेली पंचायत माजी सदस्य हिरामण काकडे,उपसरपंच आप्पासाहेब काळे,काळूराम कांबळे,थेऊरचे माजी उपसरपंच विलास कुंजीर, शहाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे,राहुल कांबळे,यशवंत कुंजीर,रामकृष्ण हभप ज्ञानोबा कुंजीर,शरद काकडे,सुखराज कुंजीर, गणेश रसाळ, गणेश कांबळे,कृषिनिष्ठ शेतकरी विजय कुंजीर रामकृष्ण पतसंस्थेचे सचिव दत्तात्रय तांबे,एकनाथ काळे, रमेश कुंजीर,दत्तात्रय कुंजीर,चंद्रकांत तारु,लक्ष्मण चव्हाण,उघोजक सुजीत काळे,गणेश काळे,सुमित कुंजीर,प्रकाश आळंदे,सचिन काकडे,सचिन कांबळे, उपस्थित होते.
लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकांत खोसे,पोलीस उपनिरीक्षक घोडके, पोलीस हवालदार, महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
