पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) मुळशी तालुक्यातील पौड येथील विठ्ठलवाडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली असून याभागातील एक घरात चोर शिरला, त्याला पकडण्यासाठी एक तरूण त्याच्यामागे धावला, त्याने हिंमत करून चोराला पकडले परंतू दमछक झाल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत असले तरीही तो आपल्यात नसल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या. अक्षय अंकुश ओबळे (वय २७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने मुळशी तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. शरद काळे असे पकडण्यात आलेल्या चोराचे नाव आहे.

पौड परिसरात असलेल्या विठ्ठलवाडी फाटा येथे राजेंद्र ओंबळे हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास झोपलेले असताना घराच्या मागच्या बाजूने कुणीतरी घरात शिरत असल्याचा त्यांना भास झाला. त्यामुळे ओंबळे यांनी शेजारी असणाऱ्या नागरिकांना याची कल्पना दिली, चोराला पकडण्यासाठी नागरिक सरसावले.याची शरद काळे याला चुणूक लागताच त्याला पकडण्यासाठी नागरिक त्याचा पाठलाग सुरु केला. त्यामध्ये अक्षय उंबरे या युवक तरुणाचा समावेश होता. पाटलाग करून त्या चोराला पकडल्यानंतर त्याला बेदम चोप देण्यात आला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान घरी पोहोचल्यावर अक्षयला दम लागल्याने अस्वस्थ वाटू लागले.त्यामुळे त्यास रुग्णालयात उपचार घेण्यासाठी नेले असता डाॅक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे सांगितले.चोराचा पाठलाग करून तरुणाने चोरास तर पकडले परंतू त्याचा हृदयविकाराने मृत्यु झाला.उंबरे परिवारावर शोककळा पसरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *