थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) वारकरी साहित्य परिषद पुणे जिल्हा आयोजित नूतन कार्यकारिणी नियुक्ती संदर्भात एका बैठकीचे आयोजन वाडे बोल्हाई येथील बोल्हाई माता सभागृहात हभप भाऊसाहेब महाराज हांडे यांच्या अध्यक्षतेखाली व हभप माऊली महाराज कुंजीर यांच्या मार्गदर्शनात पार पडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्हारराव गावडे यांनी केले, या बैठकीत तालुका स्तरीय महिला व पुरुष कार्यकारिणीची स्थापना करून नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

यामध्ये पुरुष गटात तालुकाध्यक्ष पदी हभप.विठ्ठल विष्णू गावडे,उपाध्यक्ष हभप.विलास आनंदा ऊंद्रे सचिव हभप.पांडुरंग उन्द्रे,कार्याध्यक्ष हभप.बाळासाहेब हरपळे,खजिनदार हभप.शंकर वाबळे,संपर्क प्रमुख हभप.संजय शितकल,सल्लागार हभप.संजय कोतवाल सदस्य हभप. संजय फरतडे, हभप.शांताराम कंद,उत्तम बळीबा साठे,अनंत थोरात,अनिल घुले तसेच महिला कार्यकारिणीत महिला अध्यक्ष हभप.वंदना काकडे,उपाध्यक्ष संगीता उंद्रे,लता हारगुडे,सचिव चंद्रभागा गावडे,सहसचिव सुंगंधा गीते,कार्याध्यक्ष निताताई कोतवाल,खजिनदार दयावांती म्हस्के,सल्लागार लता काकडे,सदस्य शशिकला भोसले,वैशाली गायकवाड आदी नियुक्ती करण्यात आली. तसेच यावेळी सविता गवते,सुमन वाईकर, बाळासाहेब आटोळे,मोहन पवार,प्रदीप परांडे,राजाभाऊ कड,प्रकाश नवले, वाडेबोल्हाई मा. उपसरपंच श्री.कुशाबा गावडे व जिल्हा सचिव तान्हाजी खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच वाडेबोल्हाई गावचे ग्रामस्थ व हवेली तालुक्यातील वारकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *