केसनंद:- (हवेलीनामा वृत्तसेवा) केसनंद(ता.हवेली) येथील ऑप्टिमा हाइट्स सोसायटीच्या रस्त्याचा प्रश्न केसनंदचे कार्यसम्राट सरपंच प्रमोद हरगुडे यांनी सोसायटीतील नागरीकांना रस्त्याचे काम करून देण्याचे आश्वासन दिले होते. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याने सोसायटीचे चेअरमन हरीओम राय व केसनंद गावचे सामाजिक कार्यकर्ते विपुल गायकवाड यांनी तसेच सोसायटीतील रहिवासी नागरिकांनी सरपंच प्रमोद हरगुडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी यांचे आभार मानले.
गेली अनेक दिवसांपासून सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती त्यामुळे सोसायटीत राहणाऱ्या जवळपास 2500ते 3000 नागरिक खराब रस्त्यामुळे हैराण झाले होते पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था बिकटच होत होती रस्त्यात पाण्याची डबकी साचत होती त्यामुळे जेष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना यांचा त्रास होता. रस्त्याचा प्रश्न कायम स्वरुपी मिटावा यासाठी सोसायटीचे चेअरमन यांनी केसनंद ग्रामपंचायत कडे अर्ज करुन पाठपुरावा केला त्यांच्या मागणीची दखल घेऊन केसनंदचे सरपंच प्रमोद हरगुडे तसेच सदस्य यांनी काँक्रीट रस्ता करुन दिल्यामुळे येथील सोसायटी धारकांनी ग्रामपंचायतचे आभार मानून समाधान व्यक्त केले.तर जेष्ठ नागरिकांनी ग्रामपंचायतच्या कामाचे कौतुक केले.
“केसनंद गावचे सरपंच प्रमोद हरगुडे यांनी सोसायटीतील रहिवासी असलेल्या नागरीकांची अनेक दिवसांपासून रस्ता करण्याची मागणी पूर्ण केली त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण केले त्यामुळे सोसायटीतील जेष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
(हरीओम राय चेअरमन ऑप्टिमा सोसायटी केसनंद)
