थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर येथील दिगंबर जोगदंड यांची मातंग एकता अंदोलनच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना नियुक्तीचे पत्र माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते देण्यात आले.

दिगंबर जोगदंड हे लोणी-काळभोर येथील मातंग समाजाचे तडफदार नेतृत्व म्हणून ओळखले जाते.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण केले होते.मातंग समाजातील विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्र आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
