थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेलीत गुटक्याचा कहर झाला असून प्रत्येक टपरीवर सर्रास गुटखची विक्री होत आहे यावर कारवाई करणार्‍यांचेच आशिर्वाद पाठीशी असल्याचे समजते.शासकीय यंत्रणा डोळ्यावर पट्टी लावून याकडे दुर्लक्ष करत आहे.

महाराष्ट्र शासनाने आरोग्यास विघातक असलेल्या तंबाखूजन्य गुटका तसेच सुगंधी पानमसाल्यावर बंदी घातली परंतू ही बंदी केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे.आपले हात ओले करून याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.

यातील उल्लेखनीय बाब म्हणजे कर्तव्यावर असणारे रक्षकच या गुटक्याच्या आहारी गेलेले आहेत. तसेच शासकीय कर्मचारीही याचे व्यसन करताना शासकीय कार्यालयात दिसून येतात.शाळा,महाविद्यालयीन तरुण याच्या आहारी जात आहेत.

शासनाने आपल्या कोट्यावधी महसुलावर पाणी सोडले आहे परंतू एक समांतर बाजारपेठ तयार करून परराज्यातील गुटका महामार्गावरुन पोहोचवला जातो आहे.शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.कुंपन शेत खात असेल तर रखवाली कोणाच्या भरवश्यावर सोडावी

गृहखात्याने याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे समाजातील तरुणवर्ग याच्या आहारी गेला असून कॅन्सर सारखा धुर्धर आजार यातून होण्याची मोठी शक्यता असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *