पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) भोर तालुक्यातील रांझे येथील तलाठ्यावर लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही करून त्यांना वीस हजाराची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, भोर तालुक्यातील रांझे गावातील गाव कामगार तलाठी सुधीर दत्तात्रय तेलंग याने तक्रारदार यांच्याकडे त्यांनी खरेदी केलेल्या 20 गुंठे जमिनीचे फेरफार नोंद तसेच सातबारा नोंदीसाठी प्रतिगुंठा 1000 रुपये प्रमाणे 20 हजाराची लाच मागितली यावर तक्रारदार यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केल्यानंतर या विभागाच्या पथकाने पंचा समक्ष गाव कामगार तलाठी यांना वीस हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आणि त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *