थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही लक्ष साध्य करता येत यासाठी मोठा वारसा असलाच पाहिजे असे नाही एका सर्वसामान्य शेतकरी कुंटुंबातील गायत्री ज्ञानेश्वर चंद हे कालपर्यंत कुणालाही माहीत नसलेल्या या नावाने फक्त स्वतःचंच नाही तर आपल्या कुटुंबाचं, गावाचं नाव मोठं केलं.सामान्य शेतकरी कुटुंबातील या भूमिकन्येने कोणतेही राजकीय पाठबळ नसताना, बेताचीच आर्थिक परिस्थिती असताना स्वबळावर पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन करुन पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या गुणवत्ता यादीत आठव्या स्थानावर विराजमान होवून अगदी सहजपणे तिने हे यश संपादन केले आहे.
थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असून शिक्षणाच्या जेमतेम सुविधा असलेल गाव आहे.चांगले शिक्षण घ्यायचे तर पुणे शहरात जावे लागते.ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यास गावापासून दूर पाठवताना घाबरतो.त्यामुळेच बहुतेक मुलींचे शिक्षण गावातच होत असे.मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन गायत्रीने पदवी प्राप्त केली त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी सुरु केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.
गायत्रीने मिळविलेल्या यशानंतर संपूर्ण गावातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.सोशल मीडियावर देखील एकच मजकूर फिरत होता.घरातील आजी – आजोबा,आई, पदवीधर वडील, पदवीधर बहीणी आणि शालेय शिक्षण घेत असलेल्या भावाचा तिच्या यशात मोठा वाटा आहे.
