थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) गेल्या काही वर्षांपासून थेऊर हे डेंगू मलेरिया आणि चिकूनगुणियासाठी अतिसंवेदनशील गाव होते यातून मार्ग काढत आरोग्य विभागाने सातत्यपूर्ण प्रयत्न करत यातून नागरिकांपर्यंत पोहोचून स्वच्छता बाळगण्याचे आवाहन केले.त्यानंतर यात मोठा बदल घडला.यावेळी पावसाने चांगली सुरुवात केल्यानंतर परिसरात गवताचे प्रमाण वाढले आहे परिणामी डासांची उत्पत्ती वाढली आहे.यावर नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.लुकडे यांनी केले आहे.

एकेकाळी थेऊर हे डेंगू तसेच चिकुन गुनिया याचे केंद्रस्थान होते परंतु आरोग्य विभागाकडून सातत्याने केलेल्या कामामुळे येथील या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे परंतु गेल्या दोन महिन्यात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गवताचे प्रमाण वाढले असून डासांची उत्पत्ती वाढली आहे त्यामुळे गावात काही प्रमाणात डेंगू तसेच चिकनगुनिया चे रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत डासांपासून आपले संरक्षण करण्यासाठी अंगावर पूर्ण कपडे वापरावेत तसेच डासांना पळवून लावणारी औषधी फवारणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.          कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सर्व गावांत सर्वेक्षण करण्यात येत असून घरोघरी जाऊन साठवलेल्या पाण्यात डेंगू डासाची उत्यती होत आहे का याची पाहणी केली जात आहे तसेच आजारी व्यक्तींची माहिती गोळा केली जाणार आहे.नागरिकांनी घरातील पाणीसाठे झाकून ठेवावेत असे सांगण्यात येत आहे.यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या सहाय्यक आरोग्य अधिकारी,थेऊर, नायगाव, आळंदी म्हातोबा येथील समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य सेवक, सेविका आशा सेविकांनी सहभाग घेतला.

ग्रामपंचायत कार्यालयाकडून धुरळणीचे काम हाती घेण्यात आले आहे नागरिकांनी घरात देखील धुरळणी करून घ्यावी खाद्य पदार्थ झाकून ठेवावेत असे सांगण्यात आले आहे.आपले आरोग्य रहावे यासाठी आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे.एखादा रुग्ण आढळून आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन यावा असे डाॅ.लुकडे यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *