थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह)  [शरद पुजारी] तरुण युवकांनी स्पर्धात्मक परिक्षेत आपले कसब आजमावल्यास यात नोकरीच्या चांगल्या संधी आहेत पालकांनी देखील आपल्या मुलांकडून क्षमतेपेक्षा अधिक अपेक्षा करु नये त्याच्या क्षमतेनुसार शिक्षण देऊन नैसर्गिक गुणांचा विकास करण्यावर भर द्यावा.असे प्रतिपादन लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी केले.त्यानी थेऊर येथील नुकत्याच पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त झालेल्या गायत्री चंद हिचा सत्कार करुन अभिनंदन केले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, विकास जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक जाधव , पोलीस हवालदार रामदास मेमाणे,पोलीस हवालदार रवी आहेर पोलीस हवालदार प्रशांत कळसकर,, पोलीस हवालदार नामदेव चव्हाण, पोलीस हवालदार वैजनाथ शेलार, पोलिस अमलदार शिवाजी दरेकर, पोलीस अंमलदार प्रशांत सुतार, पोलिस अमलदार अतुल रायबोले उपस्थित होते.

नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला यात ग्रामीण भागातील अनेक युवक युवती उत्तीर्ण झाल्या.थेऊर येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुंटुंबातील मुलगी गायत्री चंद हिने मुलींच्या गुणवत्ता यादीत आठवे स्थान मिळवत यश संपादन केले सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोणी-काळभोर येथील पोलीस स्टेशनचा नुकताच कार्यभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी थेऊरला भेट दिली त्यावेळी गावातील जाहिरात फलकावर गायत्रीच्या अभिनंदनाचा फलक पाहिला आणि तिला फोन करून अभिनंदन केले व पोलीस चौकीवर सत्कार करण्यासाठी बोलावले.आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी गायत्रीसोबत तिचे आजोबा व वडिल यांचाही सन्मान केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तरुणांनी हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या करीयरवर लक्ष केंद्रित करण्याचा उपदेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *