थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) वाघोली केसनंद रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे त्यामुळेच अधिकाऱ्यांची गाडी अडून त्यांच्यासमोर केसनंद रस्त्यावरील खड्डे बुजवत भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून विभागाचा निषेध करण्यात आला.

वाघोलीचा गेल्या काही वर्षांपासून विकास होत असून नागरिकीकरण मोठ्याप्रमाणात वाढले आहे.ही ग्रामपंचायत महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर अनेक समस्या कायमच उद्भवत आहे यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव सतत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत आहेत,वेगवेगळे प्रश्न मार्गी लावत आहेत.असीच एक अडचण म्हणजे वाघोली केसनंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर झालेली चाळण असून मोठं मोठे खड्डे पडले आहेत ,अनेक अपघात झाले परंतु अधिकारी यांचे जाणीपूर्वक दुर्लक्ष करत होते.नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.याचा निषेध नोंदविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी अडवून निषेध करून केसनंद रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले यावेळी पुणे महानगरपालिका शासन नियुक्त सदस्य संदिप सातव व शांताराम कटके यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *