पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) मोक्यातील सहा महिन्यांपासून फरार असलेला गुन्हेगार गुन्हेगार शाखा युनिट सहाकडून अखेर गजाआड करण्यात आला.
गुन्हे शाखा युनिट 6 कडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत पाहिजे व फरार आरोपींचा शोध व गुन्हेगार तपासणी गस्त करीत असताना समीर पिलाने यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु र नं 48/2024 भा दं वि कलम 387, 143, 148, 149, 504, 506 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1)(1),3 (2) 3 (4) प्रमाणे मोक्यातील पाहिजे आरोपी ऋषीकेश किसन खोड वय 24 रा पांडवनगर, वडकी, ता हवेली, जि पुणे हा सोनाई हॉटेलसमोर, सासवड रोड येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने या बातमीच्या अनुशंगाने पोलीस सहकाऱ्यांसमवेत जावून खात्री केली असता तो पोलीसांचा सुगावा लागताच पळून जात असता पाठलाग करून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी शैलेश बलकवडे (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे), अमोल झेंडे (पोलीस उप आयुक्त गुन्हे), सतीश गोवेकर (सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे 2) या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम ,पोलीस हवालदार विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, पोलीस नाईक कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे या पथकाने केली.
