पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) व्यवसाय करण्यासाठी बकऱ्या विकत घेवून देण्याचा बहाणा करून दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळीला पकडण्यात यश पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलीस स्टेशनची मोठी कारवाई यामध्ये अमोल काढण भोसले रा. कोळगाव ता श्रीगोंदा जि अहमदनगर, शिवा पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण वय १९ वर्षे रा. वेठेकरवाडी ता.श्रीगोंदा जि.अहदनगर ३) श्याम पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण वय २३ वर्षे रा. वेठेकरवाडी ता.श्रीगोंदा जि. अहदनगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हैद्राबाद येथील व्यक्तीला व्यवसाय करण्यासाठी स्वस्तात बकऱ्या घेवून देतो असे सांगून ऊरुळी कांचन येथे बोलावून   बकऱ्या दाखविणेसाठी शेताकडे नेले आणि  लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम पाच लाख रुपये, मोबाईल, गळयातील चेन असा ५,८३,०००/- किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. याबाबत अब्दुला लालबादशाह शेख वय ३० वर्षे रा. हैद्राबाद, जेडीमेटला एरीया, जि. रंगारेड्डी  आंध्रप्रदेश यांनी ऊरूळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणेत आलेला होता   या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू असताना सीसीटीव्ही तपासण्यात आले. गुन्हयाची कार्यपद्धतीचा अभ्यास केला. गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की  गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल काढण भोसले रा. कोळगाव ता श्रीगोंदा जि अहमदनगर याने त्याचे साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे समजले.या गुन्ह्यातील आरोपी त्याच्या साथीदारांसोबत सध्या खोपोली परीसरात राहत असल्याची बातमी मिळाली असता तपास पथकाने संशयित गुन्हेगार अमोल भोसले हा त्याचे साथीदारांसोबत लोणावळा परीसरात आला असल्याची बातमी तपास पथकाला मिळाली, बातमीप्रमाणे सापळा लावून १) अमोल काढण भोसले वय ३२ वर्षे रा. कोळगाव पांढरेवाडी ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर २) शिवा पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण वय १९ वर्षे रा. वेठेकरवाडी ता.श्रीगोंदा जि.अहदनगर ३) श्याम पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण वय २३ वर्षे रा. वेठेकरवाडी ता.श्रीगोंदा जि. अहदनगर यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. यातीलआरोपी विरुद्ध पुणे ग्रामीण, अहमदनगर जिल्हयात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरीचे एकुण ९ गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी  पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक  संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ऊरळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, पोलिस उपनिरीक्षक अमित सिदपाटील,पाडुळे पोलीस अंमलदार सचिन घाडगे, दिपक साबळे, अजित भुजबळ, विक्रम तापकीर, योगेश नागरगोजे, राजु मोमीन, अतुल डेरे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू वीरकर यांनी केली.पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *