पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह)हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणूकीत शेतकरी सभासद हित डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीत एक उच्चशिक्षित अनुभवी असे पॅनल तयार केले. अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलचे सर्व उमेदवारांनी प्रत्येक गाव वाडी वस्तीत जाऊन कारखान्याच्या सभासदांच्या भेटीगाठी घेऊन कारखाना.चालू करण्याचे व्हिजन सांगितले गेली दहा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचार फेरी मध्ये मतदारांनी आम्हाला भरघोस पाठिंबा दिला त्यामुळे या कारखान्यावर आमचेच उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील व निवडणुकीच्या निकालानंतर ते कारखाना चालू करुन शेतकऱ्यांचे  स्वप्न साकार करणार असे प्रतिपादन पॅनल प्रमुख व कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर यांनी केला.लोणी काळभोर येथील खोकलाई देवी चौकात अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलची प्रचाराची सांगता सभा झाली यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी कांचन,जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर,संचालक राजाराम कांचन, सुदर्शन चौधरी,कारखान्याचे माजी संचालक सुरेश घुले, सुभाष काळभोर, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, महादेव कांचन, राजीव घुले, रोहिदास उंद्रे, राजेंद्र टिळेकर,सुरेश घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती युगंधर काळभोर, राजेंद्र खांदवे, वंदना काळभोर, बाबासाहेब काकडे, मारुती कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, रामभाऊ कुंजीर, तुकाराम पवार, सुभाष उंद्रे, भरत कुंजीर, अशोक खांदवे, जी. बी.चौधरी, उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन, लोणी काळभोरचे माजी सरपंच शरद काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, कमलेश काळभोर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना माधव काळभोर म्हणाले जुना कारखाना किंवा संपूर्ण नवीन अत्याधुनिक कारखाना सुरू करण्यात येईल. नवीन कारखाना सुरू केला तर साखर उतारा वाढतो, बगॅस शिल्लक रहातो. नवीन कारखान्यात कामगारांचा पगार कमी लागतो. त्यामुळे कारखान्याला प्रतिवर्ष १० कोटींचा फायदा होईल. कारखाना सुरू करण्याची ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केलेली आहे.कारखाना सुरू करण्यासाठी बँकांशी चर्चा झाली आहे. केंद्र व राज्य सरकार, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल यांच्या मदतीने निधी उपलब्ध होणार आहे. फक्त आरोप करुन कारखाना सुरू होणार नाही. त्यामुळे आम्ही असल्या आरोपांकडे लक्ष न देता कारखाना सुरू करण्यावर भर दिला आहे.विरोधक कारखाना सुरू करण्याऐवजी खोटे आरोप करण्यात दंग आहेत विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत. त्यामुळे सर्व मतदारांनी अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनल निवडून आणण्यासाठी ‘पॅनल टू पॅनल’ मतदान करावे व किटली या चिन्हावर शिक्का मारून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन माधव काळभोर यांनी केले आहे .या वेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर म्हणाले, यशवंत सहकारी साखर कारखाना व कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन्ही संस्था हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांशी संबंधित संस्था आहेत. त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत असताना मदत करणे, हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्य आहे. या संदर्भात तत्कालीन पणन संचालक अनिल कवडे यांनी प्रस्ताव दिला होता. कारखाना सुरु करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती भरीव मदत करणार आहे.यावेळी बोलताना राजीव घुले म्हणाले, २०११ साली फक्त ३१ कोटी रुपये कर्ज यशवंत कारखान्यावर होते. तरीही यशवंत कारखाना प्रशासकाच्या ताब्यात दिला. महाराष्ट्रातील इतर अनेक सहकारी साखरकारखान्यांवर २०० कोटी कर्ज होते, तरी शासनाने प्रशासकाच्या ताब्यात दिले नाहीत. वन टाईम सेटलमेंट करुन हे कर्ज कमी होऊ शकते. त्यामुळे एक गुंठा जमीन न विकता आपण कारखाना सुरू करु शकतो.मी नांदेड जिल्ह्यात एक साखर कारखाना यशस्वीपणे चालवत आहे. यशवंत कारखाना सुरु व्हावा म्हणून मी माझ्या तेथील अनुभवाचा उपयोग करणार आहे. या संदर्भात माधव काळभोर यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. आगामी काळात यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु करुन आम्ही चांगल्या पद्धतीने चालवू. या संदर्भात आवश्यक तेथे बँका, राज्य व केंद्र सरकार यांची मदत घेणार आहे.यशवंतच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *