पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) स्थानिक गुन्हे शाखा, व नारायणगाव पोलीस स्टेशनची कामगिरी उल्लेखनीय कामगिरी ४८तासाच्या खेडद येथील वृध्द महिलांच्या खूनाचा छडा लावून खून करणाऱ्या शेत मजूर पती पत्नीला केली अटक.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१२ फेब्रुवारी ला मांजरवाडी ता. जुन्नर, जि. पुणे गावातील धनवटमळा येथील सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे वय ७० वर्षे या एकटया घरी असताना त्यांचा घरी कोणतरी अज्ञात व्यक्तीने गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केला होता. त्यांचे घरातील कपाट उचकटलेले व कपडे अस्ताव्यस्त होते.याबाबत  नारायणगाव पोलीस स्टेशन येथे खूनाचा व चोरीचा गुन्हा नोंदविणेत आला होता.दिवसा भर दुपारी लोकवस्तीत घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक  पंकज देशमुख,  अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने तपास पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखाचे पथक व नारायणगाव पोलीस स्टेशनकडील पथके तयार करून घटनास्थळाकडे येणारे सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासण्यात आले.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून  खोडद परीसरात शेत मजुरीसाठी वाशिम जिल्हयातील एक पती-पत्नीचे जोडपे आले होते, ते जोडपे अचानक आठ दिवसांपूर्वी निघुन गेले होते, परंतु ते पती-पत्नी गुन्हा घडलेल्या धनवट मळा परीसरात घटनेच्या दिवशी दिसून आले होते. अशी बातमी मिळाल्याने संशयित जोडप्याची माहिती मिळवून स्थानिक गुन्हे शाखाचे पथक नारायणगाव पो स्टे कडील स्टाफच्या मदतीने  वाशिम जिल्हयाकडे रवाना झाले. दरम्यान संशयित पती-पत्नी हे अहमदनगर एस.टी. स्टैंड परीसरात थांबलेले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना त्या ठिकाणाहून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी त्यांचे नाव १) शिवम ऊर्फ संकेत शाम श्रीमंत, वय २१ वर्षे, २) पुनम संकेत श्रीमंत, वय २० वर्षे, दोघे मुळ रा. गजानन नगर, चिखली, ता. चिखली, जि. बुलढाणा यांनी गुन्हा केल्याचे व मयत सुलोचना टेमगिरे यांच्या घरातून त्यांचा मोबाईल व सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल हस्तगत करणेत आलेला आहे. त्यांनी चोरी केलेले सोन्याचे दागिन्याबाबत त्यांचेकडे चौकशी चालू असून सदर गुन्हयास भा.दं.वि.क. ३९७,३४ असे वाढविणेत आले आहे.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पो.स्टे. चे सपोनि महादेव शेलार, स्था.गु.शा. चे सपोनि राहुल गावडे, पोसई अभिजीत सावंत नारायणगाव पो.स्टे. चे पोसई सनील धनवे, जगदेवाप्पा पाटील, विनोद धुर्वे, स्था.गु.शा. चे पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजू मोमीण, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, अक्षय नवले, संदिप वारे, शैलेश वाघमारे, तुषार भोईटे, संतोष कोकणे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सत्यम केळकर, निलेश शिंदे, अक्षय सुपे, दगडू विरकर, सचिन सातपुते, आदिनाथ लोखंडे, गोविंद केंद्रे, मंगेश लोखंडे, दत्ता ढेंबरे, महिला अंमलदार तनश्री घोडे यांनी केली आहे.पुढील तपास नारायणगाव पोलिस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *