पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) स्टेम पार्क इनोव्हेशन फेस्ट-२०२३ राष्ट्रीय अटल टिंकरिग लॅब स्पर्धेत साधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. दहावी-बारावी आणि स्पर्धा परीक्षेबरोबर विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधनामध्ये साधना विद्यालयाने वरचा क्रमांक कायम राखला आहे, असे स्पष्ट विचार आमदार चेतन तुपे-पाटील यांनी व्यक्त केले.

केंद्र शासनाच्या
निती आयोग, व लर्निग लिंक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “स्टेम स्पार्क इनोवेशन फेस्ट-२०२३” राष्ट्रीय पातळीवरील अटल टिंकरिग लॅबमधील विद्यार्थ्यांसाठीची स्पर्धा व प्रोजेक्ट प्रदर्शन बेंगलोर इंटरनॅशनल सेंटर, बंगळूर येथे आयोजित केली होती. राष्ट्रीय स्तरावरील शंभर प्रोजेक्ट्समधून साधना विद्यालयातील अटल टिंकरिंग लॅबमधील प्रणव भाटगावे, तेजस गायकवाड या विद्यार्थ्यांनी फार्मर हेल्पींग रोबोट हा प्रोजेक्ट सादर केला. त्या प्रोजेक्टची पहिल्या पाच प्रोजेक्टमध्ये उत्कृष्ट प्रोजेक्ट म्हणून निवड झाली.
अटल इनोवेशन मिशन, नीती आयोग भारत सरकारचे संचालक डॉ. चिंतन वैष्णव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.गौरविण्यात आले. रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणेचे अटल टिंकरिंग लॅब समन्वयक मुराद तांबोळी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन आमदार चेतन तुपे-पाटील, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीपआबा तुपे, अरविंद तुपे, विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार, प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, माधुरी राऊत, आजीव सेवक अनिल मेमाणे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *