पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) हवेली तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांचे ऑडिट करण्याची मागणी हवेली तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल सातव यांनी निवेदनाद्वारे मागणी पुणे प्रादेशिक परिवहनसह शिक्षण आयुक्त, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी याकडे केली आहे. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असून शहरा लगत असलेल्या उपनगरामध्ये वाघोलीसह अनेक मोठी गावे असून या ठिकाणी अनेक लहान मोठ्या शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्थेमध्ये वाघोली सह इतर गावांमधील विद्यार्थी मोठया प्रमाणावर शिक्षण घेत आहेत या शालेय विद्यार्थ्यांची ने- आन करण्याकरता स्कूल बस, रिक्षा, स्कूल व्हॅन, यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो यामधील अनेक वाहनांची आरटीओ कडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे दिसत आहे तर अनेक वाहने आरटीओच्या नियमाचे उल्लंघन करत भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहन चालकांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसणे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणे सिनेमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र सध्या वाघोली दिसत आहे अशा सर्व बेकायदेशीर वाहनचालकांवर तसेच शिक्षण संस्थेंवर योग्य ती कारवाई करावी उपनगरातील वाघोली सह सर्व शाळा महाविद्यालयातील बस स्कूल बस स्कूल व्हॅन रिक्षा यांचे ऑडिट करण्यात यावे तसेच वाहन चालकांची शाळेच्या वतीने वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे हवेली तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल सातव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *