पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  रोहित्र चोरीच्या घटनेनंतर आता चोरट्यांनी फ्युज बॉक्सकडे मोर्चा वळवला असून यातील तांब्याच्या पट्ट्या चोरीच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे परंतु महावितरण ला मात्र याबद्दल काहीच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे ही सार्वजनिक संपत्ती असून याची अशी लूट होत आहे.याची महावितरण पोलिसात तक्रार दाखल करण्यात चालढकल का करत आहे हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

         पूर्व हवेलीतील महावितरणच्या उरुळी कांचन कार्यालयाच्या क्षेत्रात असलेल्या थेऊर येथे गेल्या काही दिवसात जवळपास सहा रोहोत्रातील फ्युज बॉक्समध्ये असलेल्या तांब्याच्या पट्ट्या चोरीस गेल्या आहेत एका बॉक्समध्ये जवळपास चार किलो तांबे याप्रमाणे सहा बॉक्समध्ये मिळून एकूण २४ किलो तांबे चोरीस गेले आहे याची बाजारभावाप्रमाणे किंमत वीस हजार रुपयांच्यावर आहे. या पट्ट्या साधारण पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास चोरीस गेल्या आहेत.पण महावितरण ने या बाबतची तक्रार का दिली नाही याचे रहस्य उलगडत नाही.
          आजपर्यंत रोहित्र चोरिचा उलगडा झालेला नाही त्यात ह्या तांब्याच्या पट्याची भर पडली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *