पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा अंगणवाडी सेविकांचा विराट मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनात पोहचला आहे. नागपूरच्या टेकडी रोड परिसरात मोर्चा पोहचला आहे. विविध मागण्यासाठी राज्यातील अंगणवाडी बंद ठेवण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे भाऊबीजेच्या मानधनात भरीव वाढ झालीच पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय पेन्शन मिळालीच पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर राज्यांप्रमाणे वेतन वाढ वेतनश्रेणी देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी कामबंध आंदोलन करून नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढलेला आहे गेली 48 वर्षापासून अंगणवाडीतील एकात्मिक बालविकास योजनात अंगणवाडी सेविका मदतनीस 48 वर्षापासून काम करत आहेत अनेक वर्षापासून त्या आपल्या मागणीसाठी लढा देत आहेत परंतु राज्य शासन अंगणवाडी सेविकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर नाही आणि म्हणून चार डिसेंबर 2023 पासून राज्यात काम बंद आंदोलन सुरू केले असून बेमुदत संपाची १७ नोव्हेंबरला राज्य सरकारला नोटीस दिले आहे बैठका झाल्या परंतु बैठकांमधून काही समाधानकारक निर्णय न लागल्यामुळे आज 12 व्या दिवशी 15 डिसेंबर रोजी नागपूरला हिवाळी अधिवेशनावर भव्य आक्रोश मोर्चा आयोजित केला महाराष्ट्रातील जवळपास २ लक्ष 10000 अंगणवाडी कर्मचारीचे प्रतिनिधित्व म्हणून पंचवीस हजार अंगणवाडी सेविका मदतनीस या मोर्चात सहभागी झाले आहेत ग्रॅज्युएटी मिळावी तसेच राज्य शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे जोपर्यंत राज्य शासन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देत नाही तोपर्यंत अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा किमान वेतन 26 हजार व मदतनिसांना 20 हजार मानधन दिले पाहिजे तसेच रिटायरमेंट नंतर निर्वाह भत्ता अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मिळाला पाहिजे अशा विविध मागण्यासाठी राज्यभर अंगणवाडी कृती समितीच्या वतीने मोर्चा सुरु आहेत राज्य सरकार दखल घेऊन मागण्या मान्य करणार का याकडे संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे
