पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेलीत अवैध गौण खनिज उत्खनन जोरात चालू असून याकडे महसूल विभागाकडून मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे यावरून हा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय का असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे.
पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका गावात वाळू वॕशिंग सेंटरला महसूल अधिकारी कारवाईसाठी पोहोचल्यानंतर वॕशिंग सेंटर वाल्यांची जोरदार पळापळ झाली त्यामुळे आता यावर कारवाई होईल असे वाटत असतानाच यात काहीतरी विशेष घडले
त्यानंतर सर्व पूर्ववत झाले कारवाईचा फार्स झाला यामुळे यात नेमके कोणाचे भले झाले याचीच उत्सुकता आहे.
पर्यावरणाचे लचके तोडणाऱ्यांना कुणाकडून अदृश्य हात मिळतोय याचीच वरिष्ठ पातळीवर चौकशी होणे आवश्यक आहे.जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले तर पर्यावरणाचा ह्रास थांबेल.
अनेक ठिकाणी मोठमोठे मुरुमचे डंपर खुल्लेआमपणे वाहतुक करतात परंतु महसूल विभाग याकडे जाणूनबुजून डोळे छाक करत आहे की काय असा आरोप पर्यावरण प्रेमी करत आहेत. मुरुम उत्खननामुळे पर्यावरणाचे आतोनात नुकसान होत आहे याला नक्की कोणाला जबाबदार धरायचे चोरी करणारा की चोरीला साथ देणारा
