पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) रासायनिक किटकनाशके व खतांच्या अती वापराने शेतीचा कस कमी झाला अर्थात शेती आजारी पडली कही भागात तर आयसीयूत गेली, शेती नापिक झाली तर हेच रसायनयुक्त भाजीपाला आणि फळे खाल्ल्यामुळे संपुर्ण मानव जातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेतीच शेतकऱ्यांना तारू शकते व नैसर्गिक शेतीच्या माध्यमातूनच उत्पन्न वाढ होऊ शकते त्यामुळे सर्व शेतकरी वर्गानी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन प्रशिक्षक अशोक साब्दे व डॉ युगंधरा बर्गे यांनी केले.

आर्ट ऑफ़ लिव्हींग चे श्री श्री इंस्टीटयूट ऑफ़ अग्रिकल्चर सायन्सेस ऐण्ड टेक्नोलोजीच्या तीन दिवसीय प्रशिक्षणाच्या सांगता परिसंवादात ते बोलत होते.

त्रिवेणी आश्रम मरकळ येथे झालेल्या या शिबिरात शेतकर्‍नी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला.अनेक जिल्ह्यातून या शिबिरासाठी शेतकरी बंधू भगिनी उपस्थीत होत्या.तणावमुक्त जीवन तसेच विषमुक्त अन्न या संकल्पनेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांनी नैसर्गिक निविष्ठा बनविण्याचे तंत्र शिबिरात शिकविण्यात आले.जीवामृत, निमास्त्र , अग्नी अस्त्र तसेच बायो एन्झायम यांच्या वापराने कमी खर्चात शेती कशी करायची या बद्दल माहिती देण्यात आली.नैसर्गिक पध्दतीने उत्पादित उत्पादनाला चांगला बाजार भाव मिळावा याकरिता सुध्दा आर्ट ऑफ़ लिव्हींग च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.शेवटच्या दिवसी लक्ष्मी तरू या फायद्याच्या रोपाचे सुध्दा वाटप करण्यात आले.

हे शिबिर यशस्वी करण्या करिता महाराष्ट्र ( एस टी सी ) सुधीर चापते , आरती रुणवाल, शरद सायनकर, रचना फसाटे, सुचिता कुळवडे, अक्षय रासकटला, किशोर थोरात, मिलिंद साखळकर, प्रभाकर जगताप तसेच संपुर्ण श्री श्री ऐग्री महाराष्ट्र पथकाने कार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *