थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता सप्ताह साजरा करण्याचा संकल्प केल्यानंतर आज रविवार सुट्टीचा दिवस असताना देखील गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालय,शालेय विद्यार्थी तसेच विविध कार्यालयातील कर्मचारी यांनी स्वच्छता करण्यासाठी हातात झाडू घेतले.

कुंजीरवाडी गावचे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते सचिन तुपे व वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार व शाळेचे शिक्षक व शिक्षिका व ग्रामस्थ यांनी सर्वांनी मिळून सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा येथे ग्राम स्वच्छता अभियान राबवले.सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले सचिन तुपे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रामदास जाधव, पोलीस अंमलदार कांबळे, पवार,मडके, पोलीस हवालदार ढाकणे, मेहत्रे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकांनी या विधायक कामात सहभाग घेतला संपूर्ण परिसर चकाचक केला.

बहुतेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तर स्थानिक पदाधिकारी फोटो काढण्यात दंग होते.
देश पातळीवर सध्या प्रदुषण नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे.अलिकडे सर्वत्र प्लास्टिकचा कचरा वाढत असताना यावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.पूर्व हवेलीतील बहुतेक गावातील बाजारपेठेत सर्रास याचा उपयोग होतो आहे.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मानसिकता कधी तयार होणार हा प्रश्न अधोरेखित आहे.
