पुणे [हवेलीनीमा वृत्तसमुह] बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक अनपेक्षित घटना घडताना दिसत आहेत अगदी कोवळ्या वयात देखील हृदय विकारासारखा झटका येऊ शकतो हे एका घटनेनंतर स्पष्ट झाले इयत्ता आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.हडपसर येथील वेदांत धामणगांवकर (वय 14 विकासावर,वानवडी,पुणे) असे मृत मुलाचे नाव आहे.वानवडी पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वेदांत हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. शाळेला सुट्टी लागल्यामुळे तो मित्रांसोबत गुरुवारी सकाळी क्रिकेट खेळायला गेला होता. खेळत असताना वेदांतने वडिलांना फोन करून त्याच्या छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याला ताबडतोब जवळच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. त्यावर त्यांनी वेदांतला फातिमानगर येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या वेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अचानक आपला मुलगा अचानक मृत पावल्याने आई वडीलांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *