पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे भाजपा नेते गणेश बिडकर यांना व्हाॅटस् अप काॅल करुन 25 लाखाची खंडणी मागण्यात आली यामुळे एकच खळबळ उडाली आहे.काही दिवसापूर्वीच माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावे काॅल करुन खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे.
काल गणेश बिडकर श्रीराम जन्मोत्सव मिरवणूकीत असताना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका नंबरवरून व्हाॅटस् अप काॅल आला आणि आर्वाच्य भाषेत शिविगाळ करत 25 लाखाची खंडणी मागितली आणि राजकीय कारकीर्द खराब करण्याची धमकी देण्यात आली यावर बिडकर यांनी ताबडतोब सायबर सेलकडे गुन्हा नोंदवला आहे.
