थेऊर [हवेलीनामा वृत्तसमुह] एक गाव एक गणपती याच धर्तीवर गेल्या काही वर्षांत एक गाव एक शिवजयंती हा अभिनव उपक्रम तरुणांकडून राबवला जात आहे पूर्व हवेलीतील बहुतेक सर्वच गावातील तरुणांकडून याच पध्दतीने शिवजयंती उत्सव साजरा केला जातो.श्रीक्षेत्र थेऊर येथील सर्व तरुणांकडून एकत्र येत तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा माणस ठेवून हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

यंदाचे हे दुसरे वर्ष होते गावातील सर्व युवावर्ग शिवभक्त शिवजयंती निमित्त एकत्र येऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
शिवजयंतीच्या पूर्व संधेला शिवज्योत आणण्यासाठी शिवभक्त पुरंधर किल्ल्यावर गेले शिवजयंतीच्या दिवशी सकाळी आठ वाजता शिवज्योत गावात आणली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला गावातील माजी सैनिक तसेच पोलिसांच्या हस्ते पुष्पहार घालून महाआरती घेण्यात आली. जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते यात अनेक शिवभक्त तसेच महिलांनी रक्तदान केले.

सायंकाळी छत्रपतींच्या पुतळ्याची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यात प्रमुख आकर्षण ठरले ते शिवकालिन मर्दानी खेळ, पारंपरिक वेशभूषा करुन अनेक प्रकारची खेळ सादर करण्यात आले यात तलवारबाजी, दंडपट्टा, भाला, अग्नीचक्र अशा अनेक शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर करून शिवभक्तांची मने जिंकली ढोल ताशांचा गजर,डीजे डाॕल्बीचा आवाज आणि फटाक्याची आतषबाजी यामुळे संपूर्ण थेऊरगाव शिवमय झाले होते गावात सर्वत्र भगवे झेंडे लावून गाव भगवेमय झाले होते मिरवणूकीची सुरुवात ग्रामपंचायत चौकातून झाली ग्रामप्रदक्षिणा पुर्ण करुन चौकातच शिव नामाचा जयघोषाने असमंत दुमदुमला या मिरवणूकीत लहान मुले,मुली,गावातील शिवभक्त डोक्यावर भगवे फेटे बाधून मिरवणूकीत सहभागी झाले होते यावेळी ढोलताशाच्या गजर तसेच डिजे सिस्टमवर तरुणाई तसेच लहान मुलामुलींनी ठेका धरला होता साडे नऊ वाजता मिरवणूकीची सांगता झाली, शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख,पोलिस हवालदार विजय जाधव,विशाल बनकर,दिगंंबर जगताप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
