मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] संपात सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे. संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारही दिला जाणार नाही, असे सरकारने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रात नमूद केले आहे. राज्य सरकारी कर्मचारी आज (मंगळवार) पासून बेमुदत संपावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे.

संप लक्षात विभागप्रमुखांनी व कार्यालयीन इशारा प्रमुखांनी संप मिटेपर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचा- याची कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करू नये. जे कर्मचारी रजेवर त्यांची रजा रद्द करून कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र सरकारचे ‘काम नाही वेतन नाही’ हे धोरण राज्य सरकारही अनुसरणार आहे. असे पत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संप काळातील पगार मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे..

संपात सहभागी झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची गैरवर्तवणूक समजण्यात येईल. अशा कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. संपात कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या घेऊन सेवेत खंड पडू शकतो, असा सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे. संपकाळात विभागप्रमुख व कार्यालय प्रमुखांनी मुख्यालय सोडून जाऊ नये, अशा सूचनाही दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *