मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे दहावीला नापास झाल्यासारखं वाटतंय मार्च आणि ऑक्टोबर पुन्हा मार्च आणि ऑक्टोबर अशीच परिस्थिती गेल्या दोन वर्षांपासून अनुभवास येतय,सध्या निवडणुकीच्या बाबतीत पहावयास मिळते आहे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परिस्थितीवर भाष्य केले.
हिंदू मिल या ठिकाणी जगातील सर्वश्रेष्ठ सर्वात मोठं बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक अर्थात मोठा ग्रंथालय उभा राहिला पाहिजे जगातील अनेक लोक इथे येऊन अभ्यास करतील एवढा मोठा ग्रंथालय त्या ठिकाणी उभा राहिला पाहिजे असे त्यांनी पुढे म्हणाले.
ज्या दिवशी चॅनेलवर केवळ प्रतिक्रिया बंद होतील तेंव्हाच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सुधारेल कारण सध्याची राजकीय वातावरण अतिशय गलिच्छ झालेल आहे असभ्य भाषेत एकमेकांवर चिखलफेक कधीच नव्हतीच या महाराष्ट्राने नेतृत्व दिल परंतु अलिकडे मात्र खुपच गलिच्छ वातावरण तयार झालय असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी आपले विचार व्यक्त केले.
