सातारा [हवेलीनामा वृत्तसमुह] जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात मटक्याचे जाळे तयार करणाऱ्या मटकाकिंग समीर कच्छीसह (रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा) याच्यासह त्याच्या ४२ अन्य साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. एकाच वेळी मोक्का अंतर्गत झालेली महाराष्ट्रातील ही पहिली घटना आहे.मटकाकिंग समीर उर्फ शमीम सलीम शेख उर्फ कच्छी याने त्याच्या साथीदारांनी ‘कच्छी गॅंग’ या नावाने गॅग तयार करून. या टोळीच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मटका, जुगाराचे जाळे तयार केले. त्यातून मिळणारा काळा पैसा अडलेल्या लोकांना देऊन त्यांच्याकडून जास्त व्याजाची रक्कम जबरदस्तीने वसूल केरायची. एवढेच नव्हे तर व्याजाचे पैसे न दिल्यास याच गँगच्या माध्यमातून पैशासाठी अपहरण करून, मारहाण करून जबरदस्तीने पैसे वसूल केले जात असत. एका तक्रारदाराने पुढे होऊन मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह त्याच्या टोळीविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या गँगच्या विरुद्ध ही कारवाई केली. मटकाकिंग समीर कच्छीसह त्याच्या साथीदारांवर दोनशेहून अधिक जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी त्याच्या गँगवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्याकडे पाठविला होता.परंतु फुलारे हे मागील आठवड्यात साताऱ्याच्या दाैऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी या दौऱ्यातच प्रस्तावावर स्वाक्षरी करून मोक्का कारवाईवर शिक्कामोर्तब केले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, पोलिस अधीक्षकांचे वाचक व सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, दीपक इंगवले, राजू कांबळे, महेश शिंदे, केतन शिंदे यांनी या कारवाईसाठी मोलाची कामगिरी केली.
