पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे सातारा महामार्गावर पारगाव येथे रस्त्या शेजारी चहाच्या टपरीवर बुधवारी रात्री काही प्रवासी चहा पिण्यासाठी थांबले असताना तिथून जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि या ट्रकने टपरीजवळ थांबलेल्या एका कारला जोरदार धडक दिली एवढेच नाहीतर ट्रकने तिथे थांबलेल्या आणखी काही वाहनांना ठोसरले या अपघातात दोन जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

या अपघाताची भयानकता एवढी भीषण होती की कारमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये १५ वर्षांच्या मुलासह एका महिलेचाही समावेश आहे. दोघेही शिरुरमधील वडगाव रासई येथील रहिवासी असल्याचे वृत्त आहे. या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले असून ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *