लोणी-काळभोर [हवेलीनामा वृत्तसमुह] कदमवाकवस्ती फुरसुंगी गावांच्या सीमेवरील पांडवदंड रस्त्या लगत असलेल्या कोकोपिट व इतर साहित्य तयार करण्याच्या कंपनीस सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला असून मोठे अर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

नारळाच्या शेंड्यावर प्रक्रिया करून येथे काथ्या, पायपुसणी, कोकोपिट, नारळ कीस इत्यादी उत्पादने तयार होत असत. आगीने रौद्र रूप धारण केल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तब्बल दीड तास चार अग्निशामक बंबाच्या सहाय्याने अथक प्रयत्नांनंतर तर कदमवाकवस्ती येथील स्थानिक नागरिकांनी पाण्याच्या टँकरची व्यवस्था केल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

आज बुधवारी कंपनीत कोकोपिट तयार करणार्‍याचे मशीन सुरु राहिल्याने तसेच तापमानात वाढ झाल्याने मशीनने पेट घेतला असावा असा तर्क लावला जातो आहे. तेथील कच्चा माल वाळलेली नारळांनी पेट घेतला आणि काही वेळातच आगीची दाहकता वाढत गेली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *