बीड [हवेलीनामा वृत्तसमुह] जगप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित समजली जाणारी डॉ.मेरी क्युरी फेलोशिप बीडच्या पाटोदा तालुक्यातील रोहतवाडीचे सुपुत्र डॉ. महेश नागरगोजे यांना जाहीर झाली आहे.

युरोपियन कमिशनकडून दरवर्षी पोस्ट डॉक्टरल रिसर्चसाठी डॉ.मेरी क्युरी यांच्या नावाने फेलोशिप दिली जाते. संशोधनासाठीची ही प्रतिष्ठित फेलोशिप मिळवण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते. यावर्षी डॉ. महेश नागरगोजे यांना पुढील दोन वर्षांसाठी ही फेलोशिप मिळाली आहे. ही फेलोशिप १ कोटी ७० लाख रुपयांची आहे.

सर्वसाधारण कुटुंबातील डॉ. महेश नागरगोजे यांचे प्राथमिक शिक्षण रोहतवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. नंतर पाटोदा येथील पीव्हीपी कॉलेजमध्ये आणि पुढे अभियांत्रिकीची पदवी घेऊन एम. टेक. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केले. आयआयटी गुवाहाटी येथून डॉक्टरेट पूर्ण केली. लहानपणी वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन अवघ्या ३३ व्या वर्षी डॉ. महेश यांनी ९७ टक्के गुण संपादन करीत ही फेलोशिप मिळवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *