पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] बारामती-इंदापूर रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी वेगवान होती की दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना इंदापूर रस्त्यावर बारामती जंक्शन येथे घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अनिता शिवाजी शिंदे आणि अर्चना श्रीशल्य सन्मत अशी या भीषण अपघातात जीव गमावलेल्या महिलांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दोन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत अनिता आणि अर्चना या दोघी रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात होत्या. त्या सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या. मात्र, बारामती-इंदापूर रस्त्यावर जात असताना भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दोघींनाही धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही महिला रस्त्याच्या कडेला पडल्या. या अपघातात दोन्ही महिलांच्या डोक्याला व शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *