पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे शहरातील सर्वात गजबजलेला उच्चभ्रु सोसयाटी बंगलो असलेल्या कोरेगाव पार्क येथील एका वाणिज्यिक वीज ग्राहकाने स्वतःच्या मीटरमध्ये हेराफेरी करुन वीजचोरी केल्याचे मीटर तपासणी दरम्यान उघड झाल्यामुळे आधिकारी देखील चक्राऊन गेले या ग्राहकाला तब्बल एक कोटी 27 लाख 50 हजार रुपयांचे बील देण्यात आले आहे.प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी वीज चोरीविरुद्ध मोहीम राबविण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार राबविण्यात आलेल्या वीज मीटर तपासणी मोहिमेत ही चोरी उघडकीस आली आहे.

या ग्राहकांनी वीज मीटरचे सील तोडून मीटरमध्ये प्रत्यक्ष विजवापराची कमी नोंद होण्यासाठी रेजिस्टंन्स बसविले होते. त्यामुळे या ग्राहकाचा मिटरमधील वीज वापर प्रत्यक्षातील वीज वापरापेक्षा 79 टक्‍क्‍यांनी कमी नोंदविला जात होता.

भारतीय वीज कायदा 2003च्या कलम 135 नुसार या वीज ग्राहकास एक कोटी 27 लाख 50 हजार रकमेचे बिल देण्यात आले आहे. या रकमेचे बिल ग्राहकांनी भरल्यानंतर 6.6 लाख रुपये तडजोड शुल्क सुद्धा ग्राहकांनी भरले आहे.नुकतेच प्रादेशिक संचालक यांनी एका परिपत्रकाद्वारे 20 किलोवॅट व त्यापेक्षा जास्त भार असलेल्या ग्राहकांच्या स्थळांचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे वीज चोरीचा छडा लागत असून वीज चोरांवर कारवाई करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *