पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे पोलीस आयुक्तपदाची रितेश कुमार यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरात गुंडागर्दी करणाऱ्या तसेच दहशत माजवणाऱ्या अनेकांवर कारवाईचा धडाकाच लगावला असून यात अनेकांवर मोका अंतर्गत कारवाई काहीजणांना स्थानाबद्दल करण्यात आले केल्या काही दिवसांमध्ये शहरात कोयता गॅंगने धुमाकूळ घातल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली या कारवाईनंतर त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्या दिशेने कारवाई चालू केली.
कारवाईचा हा धडाका असा चालू असून आता त्यांनी अवैध धंद्यांकडे लक्ष केंद्रित केले असून मटका, सोरट, जुगार यांच्यावर कारवाई होत असल्याचे माहिती समोर येत आहे याच अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या थेऊर येथे अवैधरित्या चालू असलेल्या मटका व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकली असून या कारवाईत एकूण 23 जणांवर कारवाई करण्यात आली तर 68 हजार 700 रुपयांचा मध्यमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत विकास रमेश पाटील (सोरट चालक) शाम सुरेश सावंत, नितीन बबन आटोळे, वसंत केशव चव्हाण, अजित रमेश सावंत (मटका रायटर) योगेश सुरेश महाजन, कैलास दौलत सावंत, (मटका चालक) यांच्यासह गणेश राजू सिंग, अमोल मोहन घाडगे, मल्हारी रेशीम जाधव, विकास रामदास आठवले, रियाज बाबुराव शेख, आकाश खुडे, शुभम सुनील भगत, प्रथमेश कैलास कड,शुभम भगत,राजेंद्र बालाजी घरकळ,वैभव रामदास सावंत, राजन दत्तात्रेय गावडे, गणेश सुदाम राखपसरे, राजेंद्र निवृत्ती सुरवसे, पांडुरंग निवृत्ती राखपसरे, साहेबराव निवृत्ती राखपसरे, आणि ज्ञानेश्वर निवृत्ती राखपसरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सर्वांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाकडून करण्यात आलेल्या या अवैध धंद्यावरील कारवाईनंतर गावात एकच चर्चा सुरू झाली, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सुरू केलेल्या या कारवाईनंतर अनेक अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गुटखा विक्रीवर प्रतिबंध लावण्यासाठी कारवाईतील सातत्यता पाहिल्यानंतर आता अवैध धंद्यांकडे अशाच कारवाईच्या सातत्याची आवश्यकता असल्याची नागरिकाच्या चर्चा आहे.
ही कारवाई सामाजिक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आश्विनी पाटील, पोलीस हवालदार कुमावत, राणे,पुकारे,पठाण, कांबळे,पोलिस शिपाई जमदाडे आणि संदीप कोळगे आणि थेऊर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख,पोलीस नाईक विशाल बनकर यांनी केली.पुढील तपास पोलीस हवालदार दिगंबर जगताप करीत आहेत.
