थेऊर [हवेलीनामा वृत्तसमुह] तीर्थक्षेत्र थेऊर येथील ग्रामदैवत श्री म्हातारीआई देवीचा उत्सव उद्या 5 फेब्रुवारी 2023 व सोमवार 6 फेब्रुवारी 2023 या दिवशी साजरा होणार आहे सालाबादप्रमाणे या उत्सवाचे आयोजन थेऊर सार्वजनिक उत्सव कमिटी यांच्यावतीने करण्यात येते यामध्ये रविवार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत श्री म्हातारीआई देवी नैवेद्य तसेच सुवासिनींचा कार्यक्रम होईल तसेच संध्याकाळी रात्री नऊ ते बारा यादरम्यान देवीच्या छबिन्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

6 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा नटरंगी नार हा सदाबहार कार्यक्रम होणार असून सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडणार आहे.

थेऊर सार्वजनिक उत्सव कमिटीच्या वतीने यावर्षी प्रथमच 26 निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा करण्याचे नियोजन केले असून गावातील स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य कार्यक्रम होणार आहे त्यामुळे या जंगी आखाड्यास कुस्ती शौकिनांनी उपस्थिती लावावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *