पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) यवत पोलीस स्टेशन खाद्यतील भीमा नदीच्या पात्रात गेल्या चार दिवसात आढळले तब्बल सात मृतदेह मतदिहांची ओळख पटली असून ती एकाच कुटुंबातील सर्व सदस्य असल्याची माहिती मिळत आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस त्याचा सखोल तपास करत आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यवत पोलीस स्टेशन परिसरातील दिनांक १८/०१/२०२३ रोजी १२:३० वा. चे. सुमारास पारगाव गावचे हद्दीत भिमा नदीच्या पात्रात एक अनोळखी महीलेचे प्रेत आसल्याची माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले व पाहणी केली एका अनोळखी महीलेचे प्रेत मिळुन आले असुन ते मयत महीलेचस ग्रामीण रूग्णालय यवत येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.त्यानंतरयाच परिसरात पुलाच्या पुर्वेस भिमा नदीचे पात्रात ता. १८/०१/२०२३ ते २२/०१/२०२३ दरम्यान एकुण ०७ मृतदेह सापडले असुन त्याची थोडक्यत माहीती खालील प्रमाणे १) मोहन उत्तम पवार, वय ४५ वर्षे, रा. खामगाव ता. गेवराई जि. बिड (पती) २) संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार, वय ४० वर्षे, रा. खामगाव ता. गेवराई जि. बिड (पत्नी) ३) राणी शाम फलवरे, वय २४ वर्षे, रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद (विवाहीत मुलगी) ४) शाम पंडीत फुलवरे, वय २८ वर्षे, रा.हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद (जावई) ५) रितेश उर्फ भैया शाम फलवरे, वय ०७ वर्षे, रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद (नातु) ६) छोटू शाम फलवरे, वय ०५ वर्षे, रा. हातोला ता. वाशी, जि. उस्मानाबाद (नातू) ७) कुष्णा शाम फलवरे, वय ०३ वर्षे, रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद ( नातु)
या मृतामधील अनोळखी नातेवाईकांचा शोध यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग पुणे ग्रामीण हे करीत असताना दिनांक २०/०१/२०२३ रोजी नदीपात्रात मिळालेल्या मृत महीलेजवळ एक मोबाईल फोन सापडला त्यावरून यातील नातेवाईकांचा शोध घेवुन नातेवाईक यांना मिळाले मत महिला व इसमांचे फोटो व चिजवस्तु दाखवुन त्या इसमाची ओळख पटविण्यात आली आहे.
यावरून मिळालेल्या माहीतीनुसार मोहन पवार हे पत्नी संगिता उर्फ शहाबाई, मुलगी राणी, जावई शाम, नातु रितेश, छोटु, कृष्णा यांचेसह व मुलगा अनिल यांचेसह मागील १ वर्षापासुन निघोज ता. पारनेर येथे राहुन मजुरी काम करीत होते.
यापैकी चार मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असून त्यांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याबाबत अहवाल मिळाला आहे. चारही मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नाहीत. सदर घटनेच्या अनुषंगाने अकस्मात मयत नोंद करण्यात आलेले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे करीत आहेत.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग राहुल धस यांनी भेट दिली असुन वेगवेगळी पथके वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया दृष्टीकोणातुन तपास करीत आहेत.
