लोणी-काळभोर (हवेलीनामा आॕनलाईन) बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी खासदार उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा संघटक निलेश दादा काळभोर,तालुका प्रमुख विपुल शितोळे,जिल्हा नियोजन मंडळ सदस्य आलंकार कांचन यांच्या नेतृत्वाखाली कदमवाकवस्ती, लोणी काळभोर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

माजी तंटामुक्त अध्यक्ष मनोज काळभोर,अनिल शिंदे विभाग प्रमुख, माजी उपसरपंच बाबासाहेब काळभोर,महिला आघाडी प्रमुख धनश्री म्हस्के,उपतालुका प्रमुख पारस वाल्हेकर, केतन साठे कार्तिक काळभोर, काळभोर गोरख लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
