पुणे (हवेलीनामा आॕनलाईन)  मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी राज्यात दोनच माणसे अशी आहेत की त्यांना वाटतं आपूनच भगवान है. ते म्हणजे संजय राऊत आणि अभिजित बिचुकले हे दोघेही गांजा ओढतात अशी टीका केल्यानंतर अभिजित बिचुकले यांनी गजानन काळे यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे.त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिल. काय नावं त्याचं? त्या माणसाचं नाव काय? अच्छा! गजानन काळे. त्याला आज अभिजित बिचुकले नाव देतोय. राज ठाकरे आमचे बंधू आहेत. राज ठाकरे तुम्हाला सांगतो तुमचा जो कोण पदाधिकारी आहे. त्याचं नाव आजपासुन आहे, गांजा काळे… गजा काळे नाही… तुझं नाव मी आजपासून देतो आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राने लक्षात ठेवा. राज ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नाव आहे गांजा काळे असे सांगत अभिजित बिचुकले यांनी संताप व्यक्त केला आहे.

गांजा काळे, तू काय म्हणतो संजय राऊत आणि मला काय म्हणतो? चल ठीक हाय की तुमचं आणि संजय राऊतांच काही वैर असेल. तू काय म्हणतो अभिजित बिचुकले गांजा ओढतो? तुझ्या सातशे पिढयांना तरी माहित आहे का की अभिजित बिचुकलेची औकात काय आहे? अभिजित बिचुकलेची जात, धर्म महाराष्ट्राच्या नावात आहे. तुला गमंत सांगतो राज दादा आहे माझा. सातारा माझं घर आहे. पण तुझ्या घरासमोर येऊन तुला फरफटत उचलून नेईन आणि राज ठाकरेसमोर कृष्णकुंज बंगल्यावर तुझे कानफाड फोडींन, असा सणसणीत इशारा अभिजित बिचुकले यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *