पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) खेड पंचायत समितीमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेचा पराभव झाल्यावर यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल असे शिवसेना नेते संजय राउत यांनी जाहीर केले आणि महाविकास आघाडीत एकच गोंधळ उडाला.आज खेडमध्ये शेतकरी मेळावा झाला त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अमदाराविरुध्द संजय राउत यांनी हे वक्तव्य केले.
महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे यात शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५४ तर कॉंग्रेसचे ४४ आमदार आहेत असे असले तरीही मुख्यमंत्री शिवसेनेचाच आहे त्यामुळे हे ठाकरे सरकार आहे.शिवसेना यात सर्वांच्या वर आहे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार यांना शिवसैनिक त्यांची जागा दाखून देतील तर जुन्नर येथील चूक सुधारून दिल्ली व मुंबईतील आपली जागा पुन्हा आपल्याकडे येईल असे वक्तव्य केले तर शिवसेनेची सर्वांनाच गरज लागते असेही ते म्हणाले.
यावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी हे ठाकरे सरकार असले तरीही ते तीन पक्षाचे असल्याचे सांगितले.
आमदार दिलीप मोहिते यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले कि,आघाडीत बिघाडी होईल असे वक्तव्य टाळणे आवश्यक आहे यात कोण बरोबर आणि कोण चूक हे खेडची जनताच येणाऱ्या काळात ठरवेल
