मुंबई (हवेलीनामा ऑनलाइन) आर एस एस बजरंग दल आणि विश्वाहिंदू परिषद या संघटनेचे कार्यकर्ते हे तालिबानी विचाराचेच आहेत असे वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी आज केले त्यावर भाजपच्या वतीने संताप व्यक्त केला असून अख्तर यांनी तमाम हिंदूंची माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले

       अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी आपली सत्ता स्थापन केल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यात प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांनी देशातील आर एस एस विश्वाहिंदू परिषद व बजरंग दलाची तुलना तालिबांनशी केली.यावर भाजपचे प्रवक्ते अतुल भातकळकर यांनी याचा समाचार घेतला जावेद अख्तर हे बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात राहून हे वक्तव्य करीत आहेत त्यांच्यात खरोखर हिम्मत असेल तर अफगाणिस्तान मध्ये जाऊन तालिबान विरुद्ध वक्तव्य करून दाखवावे असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *