थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) गोवंशातील लम्पी या चर्म रोगाने सर्वत्र थैमान घातले असून याचा सर्वात जास्त फटका राजस्थान या राज्याला बसला आहे गेल्या दोन महिन्यांत या राज्यात शासकीय आकडेवारीनुसार सुमारे पन्नास हजार गुरे दगावली असून चार ते पाच लाख गुरे या रोगाने संक्रमित आहेत. राजस्थान बरोबर गुजरातसह महाराष्ट्रात देखील हा रोग पसरत असून यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.अन्यथा याचे भयंकर परिणाम दिसतील.

राजस्थान राज्यातील परिस्थिती अतिशय भयंकर आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल दहा लाख पशुधन या आजाराने त्रस्त असून दगावलेली गुरे राज्यातील महामार्गालगत मोकळ्या जागी फेकून देण्यात आले असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.यात जवळपास दोन लाखावर जनावरे दगावल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

आपल्या राज्यात देखील या रागाचा शिरकाव झाला आहे पुणे जिल्ह्य़ातील अहमदनगर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात या आजाराने डोके वर काढले आहे.यात आंबेगाव तसेच दौंड तालुक्यातील काही गावातील गुरांना या आजाराची लागण झालेली आहे.

शहरालगत असलेल्या हवेली तालुक्यात मोठ्याप्रमाणात पशुधन आहे विशेषः पूर्व हवेलीत गाई व म्हशींचे मोठे गोठे आहेत. इतर तालुक्याचा विचार करता इथे केवळ चारच श्रेणी एक पशु चिकित्सालय आहेत बाकी श्रेणी दोन चे आहेत त्यामुळे लिम्पी सारख्या आजाराचा शिरकाव या तालुक्यात झाला तर शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे कारण एका गाईची किंमत ही साठ हजार ते ऐशी हजारांवर तर म्हशींच्या किंमती एक लाखाच्यावर आहेत.

शासकीय आकडेवारीनुसार हवेली तालुक्यात 23 दवाखाने आहेत त्यापैकी केवळ चार श्रेणी 1 त्यात दोनच जिल्हा परिषदेचे आहेत.तर दोन केंद्र सरकार अंतर्गत कार्यरत आहेत. आणि उर्वरित 19 दवाखाने हे श्रेणी 2 चे आहेत त्यामुळे आजाराचे वेळेवर योग्य निदान होण्यासाठी श्रेणी 1 च्या दवाखान्याची संख्या वाढली पाहिजे अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. या तुलनेत दौंड तालुक्यातील एकुण 27 दवाखान्यापैकी श्रेणी 1 चे 13 दवाखाने कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *