थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन)  लोणी-काळभोर येथील एक नामांकित इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारे एंजल हायस्कूल ॲड ज्युनियर काॅलेजच्या ओम हाडके या विद्यार्थ्याने जेईई या तंत्रशिक्षण पात्रता परिक्षेत चमकदार कामगिरी करत ९५ ℅ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले.यासाठी त्याला विद्यालयातील प्राचार्य शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ओम याने बारावी परिक्षेत देखील ९३.३३ ℅ गुण मिळवले आहेत.ग्रामीण भागात असूनही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व मेहनतीने त्याने उत्तुंग यश मिळवले आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद यांनी त्याच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *