थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) आपल्या वेगळेपणासाठी कायमच नावाजलेल्या जिल्हा परिषद तारमळा शाळेने या गणेशोत्सवातील दहा दिवसात आपल्या विद्यार्थ्यांसाठी दहा उपक्रम हाती घेतले आहेत यात विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असून पालकांचाही यात सक्रिय सहभाग आहे.

सर्वत्र इंग्रजी माध्यमाचे पेव फुटलेले असताना जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमातून आपल्या पाल्यांना शिक्षण देणाऱ्याची संख्या देखील अलिकडे वाढताना दिसते.थेऊर येथील तारमळा शाळेतील प्रयोगशिल शिक्षणाचा प्रभाव म्हणजे येथील वाढत जाणारा पट.

शालेय व्यवस्थापन समितीची विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी धडपड कामी येत आहे.परिणाम स्वरुप वेगवेगळे प्रयोगशिल उपक्रम होत.प्रत्येक भारतीय सण हा नाविन्यपूर्ण घेऊन येतो.

मुलांना यामागचे पौराणिक महत्त्व कळावे हा देखील या मागचा हेतू आहेच.या शाळेतील शिक्षकवृंद यासाठी कायम मेहनत घेत असतो.सध्या गणेशोत्सवाची धामधुम आहे.यादरम्यान दहा दिवस नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत.

पहिला दिवस सुलेखनाचा,दुसरा दिवस अवांतर वाचनाचा,तिसरा दिवस चित्र रेखाटनाचा, चौथा रांगोळी काढण्याचा,पाचवा दिवस परिसर भेटीचा,सहावा काव्य श्लोक वाचनाचा,सातवा दिवस वैज्ञानिक प्रबोधनाचा तर आठवा गोष्टीचा,नववा दिवस वस्तूचा संग्रह आणि दहावा दिवस मातीशी खेळण्याचा असे हे दहा दिवस विद्यार्थी गुंतले जाणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *