थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) साहित्य सम्राट हि संस्था दर वर्षी साहित्यिक श्रावण सहल सहपरिवार आयोजित करते संस्थेने आतापर्यंत चांगवटेश्वर,बनेश्वर, रामदरा, देहू, पुस्तकांचा गाव, नाणीघाट भुलेश्वर येथे सहली आयोजित केल्या. यावर्षी थोर साहित्यिक, विचारवंत छत्रपती संभाजी महाराज आणि छंदोगामात्य कवी कलश यांचे साहित्य,विचार,आणि कार्य जाणून घेण्यासाठी श्री क्षेत्र तुळापूर येथे आयोजित केली. असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी प्रास्ताविकेत व्यक्त केले.
श्रावण सहलीची सुरुवात येथील संगमेश्वर महादेव दर्शनाने झाली. इंदायणी,भीमा-भामा या त्रीवेणी नद्यांच्या संगमावर भटकंती झाल्यानंतर, निसर्ग सानिध्यातील स्मशानभूमी आवारात १५४ वे कविसंमेलन अध्यक्ष बाळासाहेब गिरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या वीर रसांच्या कविसंलनामध्ये एस.जी.फिल्मच्या गायक आणि वादक कलाकारांनी रंगत वाढवली. राहुल जाधव (निर्माते), शारदा जाधव, सुहास शिकारे(बँझोवादक), संजय साबळे( ढोलकीपटू), आनंद गायकवाड, प्रल्हाद शिंदे आणि बाबासाहेब जाधव यांनी बहारदार हिंदी मराठी गीते सादर केली.
यावेळी अजय साठे, भटू पाटील, मूळे, माळी या तरुणांनी विशेष सहभाग घेतला. कु.ओंकार अष्टुळ यांनी छ.संभाजी महाराजांच्या जीवनातील सत्य प्रसंग, साहित्य आणि शौर्य यावर आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकला. त्यास रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. कविसंलनामध्ये सौ.अलका जोगदंड, प्रल्हाद शिंदे, बबन धुमाळ, नानाभाऊ माळी, आत्माराम हारे, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, बाळकृष्ण अमृतकर, सीताराम नरके, विश्वनाथ साठे, अमोल दौंडकर, आनंद गायकवाड, प्रा.बाबासाहेब जाधव, विनोद अष्टुळ आणि बाळासाहेब गिरी या सर्वांच्या कवितांना ग्रामस्थ व रसिकांनी भरभरून साद दिली.
नंतर याच ठिकाणी वनभोजनाचा आस्वाद घेतला. पुढे सहल वढू बुद्रुक येथील छ.संभाजी महाराज, कवी कलश,आणि गायकवाड यांच्या समाधी स्थळांचे दर्शन घेवून विजय स्तंभाचा इतिहास जाणण्यासाठी कोरेगाव भिमा येथे पोहोचली. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव, सर्वांचे आभार सीताराम नरके यांनी मानले तर विनोद अष्टुळ यांनी श्रावण सहलीची सांगता केली.
