पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) हरवलेल्या व्यक्तीच्या शोधासाठी ताब्यात घेतलेले दोन मोबाईल फोन परत करण्यासाठी वडगाव निंबाळकर येथील पोलीस अंमलदाराने पन्नास हजाराची मागणी केली त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून यावर खातरजमा केल्यानंतर आज या विभागाकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार,वडगाव निंबाळकर येथील लोकसेवक पोलीस अंमलदार बाळासाहेब पंढरीनाथ पानसरे यानी त्यांचे पोलीस ठाण्यात एक व्यक्ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्याच्या तपास कामी तक्रारदाराचे दोन मोबाईल फोन ताब्यात घेतले होते ते त्यांना परत मिळावेत म्हणून त्यांनी पानसरे यांचेकडे फोनची मागणी केली असता त्याने ते हवे असल्यास पन्नास हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले त्यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली यावर या विभागाकडून पडतळणी केल्यानंतर आज पानसरे याचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव व सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *