पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) लग्न संस्कार हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी एक महत्वाचा मानला जातो त्यामुळेच लग्न जमविण्यापूर्वी वधूवर यांच्यातील गुणमिलन किती आहे हे पाहिले जाते परंतु अलिकडे हे सर्व जरी चालू असले तरीही लग्न सोहळे केवळ दिखाऊपणा होताना दिसतात कारण लग्न लावण्याचे एक विशिष्ट मुहूर्त काढले जाते आणि त्याच वेळेवर ते लागणे अपेक्षित असते यासाठीच आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने हजेरी लावतात पण अलिकडे ही मुहूर्त वेळ टाळणे ही जणू फॅशन होऊन बसली आहे.
पुणे शहरालगतच्या पट्टय़ात विशेतः हवेलीतील परिसरात लग्न समारंभाची वेळच बदलली आहे यजमान ठरवतील तोच मुहूर्त कारण लग्न समारंभात मंचावर नेते मंडळीचा मोठा राबता वाढलेला आहे अशात जे वधूवर विवाहबद्ध होणार आहेत त्याना एका बाजुला बसवुन सुरु होतो तो सत्कार समारंभ परिसरातील अनेक दिग्गज हजेरी लावतात आणि जी बाकी वऱ्हाडी मंडळी लग्नासाठी आलेली त्यांना तिष्ठत बसावे लागते.नेते मंडळीतील अनेकांना आशिर्वादपर दोन शब्द बोलण्याचा मोह आवरत नाही.
लग्न वेळ टाळणे हे जरी फॅड असले तरीही तो किती असावा याचे भानच राहत नाही सध्यातर अर्धा एक तास सोडा हा कालावधी दीड ते दोन तासावर पोहोचला आहे त्यामुळेच जमलेल्या वऱ्हाडी मंडळीत लाॅकडाऊन मधील लग्न समारंभाची आठवण जागी झाली आणि मोजक्याच नातेवाईकांमध्येच हा समारंभ किती छान होत असे अशी चर्चा रंगू लागल्या.
