पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसापासून जबरी चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते यावर नियंत्रण मिळविणे हे आव्हान निर्माण झाले त्यावर आळेफाटा पोलीसांनी आपले लक्ष केंद्रित करून अखेर तीन महिला व एका पुरुषास अटक करून त्यांच्याकडून सतरा लाख अठ्ठावण हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला व या प्रकरणातील दोन सोनारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथे एस. टी. स्टँड वर दि १८ एप्रिल रोजी जनाबाई दादाभाऊ खिलारी या एस.टी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन चोरट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले एकुण ५० हजार रूपये रोख रक्कम व १४तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकुण ०७,५०,८००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला अशी तक्रार आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये दाखल
करण्यात आली.या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आळेफाटा पोलीस स्टेशन परीसरात “आपले गाव
आपली निगराणी” या मोहीमे अंतर्गत सार्वजनिक रस्त्यावर ४००सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लोकसहभागातुन बसविण्यात आलेले होते. या पथकाने आळेफाटा एस.टी. स्टँड तसेच रस्त्यावरील सी.सी.टी.व्ही.फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये एक इंडीका कार मधील ३ महीला व एक पुरुषाची हालचाल ही संशयास्पद दिसली.
त्यानुसार पोलीस पथकाने ही इंडीका कार कोणत्या दिशेने आली व कोणत्या दिशेस गेली याबाबत आणखी सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासले असता ही कार संगमनेर बाजुकडे गेली असल्याचे दिसले त्यानुसार पोलीस पथकाने संगमनेर शहरातील सी.सी.टी.व्ही.ची पाहणी केली असता ही कार श्रीरामपुर येथे गेल्याचे कळले. त्यानुसार पोलीस पथकाने श्रीरामपुर येथे जावून दिनांक १८ एप्रिल पासुन ते १९मे पर्यंत या गाडीबाबत गोपनिय माहीती मिळवुन वेशांत्तर करून श्रीरामपुर येथेच थांबुन ही गाडी कोण वापरत आहे.याची माहीती मिळवली ज्या वस्तीत हे संशयित राहत होते त्याचे येणारे व बाहेर जाणारे रस्त्यावर लक्ष ठेवून होते.१९मे रोजी गणेश चतुर्थी असल्याने हे सर्व जण राजुर जि. जालना येथे गणपती मंदीर परीसरात चोरी करण्यासाठी जात असल्याची माहीती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकास माहीती सांगुन त्यांना ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्याने सकाळी सहा वाजता ही गाडी इंदिरानगर श्रीरामपूर येथून बाहेर निघली पथकातील साध्या वेशात थांबलेल्या पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस अंमलदार अमित माळुंजे
यांनी कारचा पाठलाग सुरू करून आळेफाटा पोलीस स्टेशनला कार बाहेर निघाल्याबाबत माहीती दिली. त्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी त्यांचे मदतीला अधिक पोलीस पथक पाठविले. या कारचा सुमारे १२५किलोमीटर पाठलाग करून त्यांना वाळुंज जि. औरंगाबाद येथे त्यांना ताब्यात घेतले. नाव-पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १) संजय भानुदास सकट, वय ४६ वर्षे, २) नंदा संजय सकट, वय ३५ वर्षे, ३) परीघा नाना राखपसरे, वय ६० वर्षे, ४) शोभा प्रताप खंदारे, वय ५५ वर्षे, सर्व रा.इंदीरानगर
श्रीरामपुर, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. त्यांना आळेफाटा पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनीआळेफाटा येथे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.तसेच यापुर्वी सुध्दा आळेफाटा परीसरात त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली असुन त्यांनी आळेफाटा परीसरात एकुण ८ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. अटक
इसमांनी गुन्हयात चोरी केलेले एकुण २४ तोळे सोने व १५ तोळे चांदी हे हस्तगत करून जप्त करण्यात आलेले आहे. तसेच याप्रकरणी आरोपींकडुन चौरीचे
सोने विकत घेणाऱ्या सोनारांना सुध्दा या गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली असुन त्यांची नावे १ ) विकास सुरेश कपिले वय ३४ वर्षे, रा. सलबतपुर, ता.
नेवासा, जि. अहमदनगर, २) जगदीश गजानन देवळालीकर, वय ४० वर्षे, रा.रामचंद्र कुंज, ता. जि. अहमदनगर अशी आहेत.त्यांच्याकडून एकुण १२,४८,००० /- रूपये किंमतीचे २४ तोळे सोने, १०,०००/- रूपये किंमतीची १५ तोळे चांदी तसेच गुन्ह्यात वापरलेली५,००,०००/- रूपये किंमतीची इंडीका कार नं. एम. एच.१७ / व्ही / ३९१ असा एकुण १७,५८,००० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे,
उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, महीला
पोलीस उपनिरीक्षक रागीनी कराळे, सहा पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, पो.हवा.विनोद गायकवाड, पो हवा लहानु बांगर, पो.हवा. भिमा लोंढे, पो. हवा प्रकाश जढर,पो.कॉ. अमित माळुंजे, पो. कॉ. हनुमंत ढोबळे, पो.कॉ. मोहन आंनदगावकर, म.पो.ना.दहीफळे, होमगार्ड प्रतिक जोरी, पोलीस मित्र संदीप गडगे, विजय ताजणे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली महीला पोलीस उपनिरीक्षक रागीनी कराळे या करीत आहेत
